Car Accident: मुंबई: चुकून ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलेटर दाबला; तरुणी दुसऱ्या मजल्यावरून कारसह खाली कोसळली

518

जगभरात जेवढे अपघात घडतात ते बहुतांशवेळा कोणाच्या कोणाच्या तरी चुकीनेच घडत असतात. अनेक अपघात हे यंत्रणेच्या चुकीमुळे घडतात. चालकांचे नियंत्रण सुटले की अपघात होतात. मुंबईत एक विचित्र अपघात झाला आहे. तरुणीने चुकून ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलेटर दाबला आणि दुसऱ्या मजल्यावरील पार्किंगमधून थेट खाली रस्त्यावर कोसळली. हा अपघात मुंबईच्या मालाडमध्ये घडली आहे. 

मालाडमधील जकारिया रोडवरील Jainsons Building मध्ये हा अपघात घडला आहे. सहा फेब्रुवारीला २२ वर्षीय अपेक्षा मिरानी ही तिच्या कारमध्ये बसली होती. कार पार्क करत असताना तिने चुकून अ‍ॅक्सिलेटर दाबला आणि कारने इमारतीची काच फोडून खालच्या मजल्यावर आली. ही कार खाली पार्क असलेल्या एका एसयुव्ही आणि सिक्युरिटी गार्डच्या मध्येच पडली .

य़ा दुर्घटनेत कारचा चकनाचूर झाला. मात्र ती तरुणी सुखरूप बचावली. नुकताच हैदराबादमध्ये असाच एक अपघात घडला. या प्रकरणात, टाटाच्या शोरूममध्ये कारची डिलिव्हरी घेत असताना एका व्यक्तीने नवीन टाटा टियागो कारचा एक्सीलेटर अशा प्रकारे दाबला की कार पहिल्या मजल्यावरून खाली पडली. या घटनेत चालकालाही काहीही झाले नसून कारचे मोठे नुकसान झाले होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here