Budget 2022: सामान्य जनतेची निराशा करणारा अर्थसंकल्प, अरविंद केजरीवाल यांची टीका

486

Arvind Kejriwal on Budget 2022: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेत्यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे, तर काही नेत्यांनी या अर्थसंकल्पाचे समर्थन केले आहे. या अर्थसंकल्पावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका केली आहे. या अर्थसंकल्पाने जनतेची निराशा केली असल्याचे केजरीवाल म्हणालेत. केजरीवाल यांनी ट्वीट करत अर्थसंकल्पावर टीका केली आहे. 

सध्या देशावर कोरोनाचे मोठे संकट आहे. या संकटात अर्थसंकल्पातून जनतेला दिलासा मिळेल असे वाटत होते, मात्र, अर्थसंकल्पातून जनतेची निराशा झाली असल्याचे केजरीवाल म्हणाले. सामान्य जनतेसाठी या अर्थसंकल्पात काहीही करण्यात आले नाही. भाजपच्या नेत्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे, तर विरोधकांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी देखील या ्र्थसंकल्पावर टीका केली आहे.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात अनेक घोषणा केल्या आहेत. मागील काही अर्थसंकल्पीय भाषणाच्या तुलनेत यंदाचे भाषण हे कमी कालावधीचे भाषण ठरले आहे. अर्थसंकल्पीय भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. आज जाहीर झालेला अर्थसंकल्प हा 100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीमध्ये विकासाचा नवीन विश्वास घेऊन आला आहे, असं वक्तव्य यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पावर व्यक्त केलं. अर्थसंकल्पाचं सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. या अर्थसंकल्पातून तरुणांच्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत. अर्थसंकल्पातील उपाययोजनांमुळे सीमा भागातील गावांना फायदा होईल. पूर्वोत्तर भारतातील नद्यांच्या किनारी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन मिळेल.  एमएसपी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आतापर्यंत 2 लाख कोटींचं हस्तांतरण होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि त्यांच्या पूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here