भारत संचार निगम लिमिटेड ( BSNL) महाराष्ट्र येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. बीएसएनएलतर्फे एकूण ५५ जागांसाठी भरती होणार असून डिप्लोमा अप्रेंटिस ची पदे भरली जाणार आहेत. या अंतर्गत अमरावती, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, गोवा, पुणे, सातारा, सोलापूर,नागपूर , अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पदाची भरती होणार आहे. अप्रेंटिस प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा आहे. पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे AICTE ने मान्यता दिलेल्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनीअरिंग किंवा टेक्नोलॉजी मध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स, ई अँड टीएस, कॉम्प्युटर, आयटी यापैकी एका ब्रांचेसमध्ये डिप्लोमा असणे अनिवार्य आहे.√ पदाचे नाव – पदविका अप्रेंटीस√ पद संख्या – 55 जागा√ शैक्षणिक पात्रता – Pass out of Diploma course in Engineering/Technology field (Refer PDF)√ नोकरी ठिकाण – महाराष्ट्र√ वयोमर्यादा – 25 वर्षे√ अर्ज पद्धती – ऑनलाईन√ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 डिसेंबर 2021 *अधिकृत वेबसाईट – www.bsnl.co.in* निवड झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिस कायदा १९६१ नुसार स्टायपेंड दिला जाईल. तसेच सरकारी नियमानुसार SC/ST/PWD/OBC/EWS इत्यादी उमेदवारांना सवलत देण्यात येणार आहे. डिप्लोमामध्ये मिळवलेली अंतिम टक्केवारी आणि मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांना २९ डिसेंबरपर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
Home महाराष्ट्र BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) अंतर्गत ‘या’ जिल्ह्यांमध्ये विविध रिक्त पदांची भरती...
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
Ahmednagar | जमिनीला भेगा पडल्यानं एकच घबराट! भूगर्भातील हालचालींमुळे बोरबन गावातील जमिनीला भेगा?
अहमदनगर : अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील (Sangmaner Taluka, Ahmednagar) एका गावात खळबळ उडाली आहे. गावातील जमिनीला भेगा (Cracks on Land) पडल्याचं गावकऱ्यांच्या निदर्शनास...
‘मी वनडे निवडीसाठी उपलब्ध आहे’: विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका मालिका गमावल्याच्या अफवा फेटाळून लावल्या
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने बुधवारी पुष्टी केली की तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध असेल आणि तीन सामन्यांच्या मालिकेत त्याचा सहभाग...
CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! देशात कोरोनाची नवी लाट येणार? तज्ज्ञांनी...
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा वेग मंदावत असतानच आता पुन्हा एकदा काही ठिकाणी कोरोनाने थैमान घालायला...







