सिंधुदुर्ग: संतोष परब हल्लाप्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी, कणकवली न्यायालयाचा निर्णय.
भाजप आमदार नितेश राणे यांनी कणकवली दिवाणी न्यायालयसमोर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केल्यानंतर नितेश राणे हे न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र, सरकारी वकील प्रदीप घरत यांनी नितेश राणे यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे.सिंधुदुर्ग: भाजप आमदार नितेश राणे यांनी कणकवली दिवाणी न्यायालयसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. आत्मसमर्पण केल्यानंतर नितेश राणे हे न्यायालयीन कोठडीत आहे.
मात्र, सरकारी वकील प्रदीप घरत यांनी नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. गेल्या दीड तासापासून न्यायालयात यासंदर्भात युक्तिवाद सुरु आहे. दरम्यान, न्यायालयाने आता पोलिसांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. पोलिसांना या प्रकरणाच्या तपासासाठी नितेश राणे यांची पोलीस कोठडी गरजेची आहे का, असा सवाल न्यायालयाने पोलिसांना विचारला आहे. त्यामुळे आता पोलिसांचा अहवाल आल्यानंतर न्यायालय नितेश राणे यांच्या पोलीस कोठडीबाबत अंतिम निर्णय घेईल. अतिरिक्त पोलीस आयुक्त याबाबतचा अहवाल घेऊन न्यायालयात दाखल झाले आहेत.
तर जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडेही कणकवली दिवाणी न्यायालयात दाखल झाले आहेत. त्यानंतर न्यायालयात पुन्हा एकदा युक्तिवादाला सुरुवात झाली आहे. नितेश राणे यांना न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली* दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतिक्षा* न्यायमूर्ती सलीम शेख यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली*
नितेश राणेंचे वकील संग्राम देसाईंचा युक्तिवाद संपला*
नितेश राणेंचा जामीन अर्ज मंजूर करा- संग्राम देसाई*
नितेश राणे यांच्या पोलीस कोठडीची गरज नाही- संग्राम देसाई*
नितेश राणे तपासात सहकार्य करत आहेत, मग पोलीस कोठडीची गरज काय- संग्राम देसाई*
नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांच्या युक्तिवादाला सुरुवात*
सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तिवाद संपला* नितेश राणे आणि राकेश परब यांची एकत्र चौकशी करायची आहे- सरकारी वकील* पोलिसांकडून नितेश राणेंच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी
पोलिसांनी नितेश राणे यांच्या १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणे हे मुख्य आरोप सचिन सातपुतेच्या संपर्कात होते. त्यांच्या संभाषणाचे सीडीआर रेकॉर्ड पोलिसांकडे आहेत. नितेश राणे बाहेर राहिल्यास हे पुरावे नष्ट करु शकतात. त्यामुळे नितेश राणे यांना १० दिवस ताब्यात द्यावे, अशी मागणी पोलिसांनी केली आहे.Nitesh Rane: आत्मसमर्पण करण्यापूर्वी नितेश राणेंना आली अमित शाहांची आठवण; ट्विट करुन म्हणाले…Nitesh Rane: नितेश राणेंच्या अटकेची शक्यता; कणकवली न्यायालयाच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप राणेंच्या अटकेची शक्यता; कणकवली न्यायालयाच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप