
नगर : मराठी सिने सृष्टीतील सुपरहिट सिनेमा असलेल्या ‘बॉईज’ (Boyz)च्या सिरीजने सर्वांचे भरभरून मनोरंजन केले आहे. ‘बॉईज ३’ च्या भरघोस यशानंतर आता ‘बॉईज ४’ (Boyz 4) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून कबीर, ढुंग्या, धैर्या पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. नुकतचं या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर आऊट झालं आहे.
‘बॉईज ४’ चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले आहे. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया हे चित्रपटाचे निर्माते आहेत. ऋषिकेश कोळी यांनी या सिनेमाचं लेखन केलं आहे. विशेष म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील हा एकमेव सिनेमा आहे, ज्याचे चार भाग बनवण्यात आले आहेत. ‘बॉईज’च्या तिन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता यावर्षी ‘बॉईज ४’ हा सिनेमा काय धुमाकूळ घालणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलं आहे.
‘बॉईज ४’ बद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, ‘आतापर्यंत ‘बॉईज’ च्या तिन्ही भागांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. या तिन्ही भागांमध्ये काहीतरी सरप्राईज होते. ‘बॉईज ४’ मध्येही असेच सरप्राईज आहे. प्रेक्षकांचे मिळणारे प्रेम पाहूनच आम्हाला ‘बॉईज 4’ करण्याची प्रेरणा मिळाली. मला खात्री आहे, हा सिनेमाही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करेल”.
अभिनेता पार्थ भालेरावने ‘बॉईज ४’ या सिनेमाचं पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,”कबीर, ढुंग्या, धैर्या पुन्हा येणार, तर धमाका होणारच ना भाई. २० ऑक्टोबरला थिएटरमध्ये धुमाकूळ घालायला येत आहेत आपले बॉईज”. या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘