- अहमदनगर (दि ९ फेब्रुवारी २०२२)- कोरोना काळात कमी रक्तदान शिबिरे झाली पण मागणी आहे त्याच प्रमाणे असल्यामुळे आपले सामाजिक दायित्व समजून शिवजयंतीच्या निमित्ताने चेडे हॉस्पिटल व सक्षम फाऊंडेशनच्या वतीने व जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने गुरुवार दिनांक 10 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता तारकपूर येथील चेडे हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉ. रेशमा चेडे यांनी सांगितले. तरी या शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे. असे आवाहन सक्षम फाउंडेशनचे शाहनवाज़ तांबोळी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 92 73 67 53 33 या नंबर वर संपर्क करावा.
Home महाराष्ट्र Blood Donation : शिवजयंतीच्या निमित्ताने चेडे हॉस्पिटल व सक्षम फाऊंडेशनच्या वतीने व...