Bhanudas Murkute : अनुभावातून प्रेरणा मिळावी म्हणून माजी विद्यार्थी मेळावा : भानुदास मुरकुटे

    155

    Bhanudas Murkute श्रीरामपूर : अशोक पाॅलिटेक्निक महाविद्यालयात (Polytechnic College) शिकलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवित आहेत. जिद्द व मेहनतीची तयारी असेल तर ग्रामीण भागातील युवकही चांगले करिअर करु शकतात, हे माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवातून कळते. त्यांच्या अनुभवापासून प्रेरणा मिळावी, या हेतूने माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले जाते, असे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे (Bhanudas Murkute) यांनी केले. अशोक पाॅलिटेक्निकच्या माजी विद्यार्थी मेळाव्याप्रसंगी (Alumni Gathering) ते बोलत होते.

    अध्यक्षस्थानी अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे होते. उपाध्यक्ष योगेश विटनोर, कार्यकारी अधिकारी मंजुश्री मुरकुटे, अशोक महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य सुनिता गायकवाड, पाॅलिटेक्निकचे प्राचार्य अंजाबापू शिंदे, अशोक फार्मसीचे प्राचार्य प्रसाद कोते, प्राचार्य रईस शेख, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विश्वजीत राऊत आदी उपस्थित होते.
    मुरकुटे म्हणाले, माजी विद्यार्थी मेळाव्याच्या आयोजनातून गतकाळातील आठवणींना उजाळा मिळतो. तसेच शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा व दिशा मिळते.

    आत्मविश्वास असेल तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही चांगले करिअर करु शकतात. अशोक पाॅलिटेक्निक महाविद्यालयात शिक्षण घेतलेले विद्यार्थी नाव कमवित असल्याचा आनंद व अभिमान वाटतो. स्वागतपर भाषणात मंजुश्री मुरकुटे यांनी मेळाव्याबाबतचा उद्देश विशद केला. महाविद्यलयाचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांचे मार्गदर्शन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरते. त्याचप्रमाणे या मेळाव्यामुळे महाविद्यालयीन जीवनाच्या आठवणी ताज्या होतात. अशा प्रकारच्या मेळाव्याचे दरवर्षी आयोजन केले जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.


    यावेळी विश्वजित राऊत, भूपेश सोनवणे, हितेश बोरूडे, ऋतुजा बोठे, संपदा पोटे, आकांक्षा शेरकर यांची भाषणे झाली. प्रास्ताविक प्राचार्य अंजाबापू शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.अरुण कडू यांनी तर आभार हितेश बोरूडे यांनी मानले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here