Bhandardara : भंडारदरा-निळवंडेतून जायकवाडीसाठी सोडले पाणी

    122

    Bhandardara : अकोले : नगर जिल्ह्यातील भंडारदरा (Bhandardara) व मुळा धरणातून (Mula Dam) मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणामध्ये (Jayakwadi Dam) प्रवरा नदीतून पाणी सोडण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता.२४) रात्री ११ वाजेच्या सुमारास भंडारदरा-निळवंडे समूहातून प्रातिनिधीक स्वरूपात १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. बंधार्‍यातील फळ्या काढल्यानंतर या धरणांमधून विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे. दरम्यान, मुळा धरणातून २६ नोव्हेंबरला जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे.

    या पार्श्वभूमीवर मुळा आणि प्रवरा नदीवरील बंधार्‍यांमधील फळ्या काढण्याच्या कामासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात प्रशासनाची बैठक झाली असून याबाबतचे नियोजन करण्यात आले असल्याचे समजते. दरम्यान, प्रवरा नदीवरील राहुरी तालुक्यातील रामपूर, केसापूर कोल्हापूर बंधारा तर श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे, गळनिंब, वळदगाव, पढेगाव, मालुंजा, भेर्डापूर, वांगी, खानापूर व कमलापूर या कोल्हापूर बंधारा परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी बंधार्‍यातील फळ्या काढण्यात येण्याची शक्यता आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here