Balasaheb Murkute : माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे

    126

    Balasaheb Murkute : नेवासा : येथील मध्यमेश्वर बंधारा व पुनतगांव बंधाऱ्यामध्ये निळवंडे धरणातून पाणी भरुन देण्यात यावे, या मागणीसाठी नेवासा खुर्द व नेवासा बुद्रूक पुनतगाव, खुपटी, चिंचबन, साईनाथ नगर या गावातील शेतकरी उपोषणास (hunger strike) बसले होते. यावर्षी पाऊस कमी झाल्याने प्रवरानदी (Pravara River) वाहती झाली नसल्यामुळे पिण्याचा पाण्याचा, चाऱ्याचा व पशुंना पाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. शासनाने दिलेल्या सुचनेनुसार भंडारदरा व निळवंडे धरणातून (Bhandardara and Nilwande Dam) प्रवरा नदीवरील संपूर्ण बंधारे पुर्ण क्षमतेने भरुन देण्याचे आदेश असतांनाही नेवासा येथील मध्यमेश्वर बंधारा व पुनतगांव बंधारा कार्यकारी अभियंता यांनी पुर्ण क्षमतेने भरुन दिलेला नाही.

    नेवासा तालुक्यातील नदी काठावरील शेतकऱ्यांवर बंधारे भरु न देता अन्याय होत असल्यामुळे बंधारा बचाव कृती समीतीने उपोषण सुरु केलेले होते. नेवासा तालुका बंधारे कृषी समिती व शेतकरी बाळासाहेब कोकणे, संभाजीराव कार्ले, संजय गायके, सुनील व्यवहारे, संभाजी पवार, बाळासाहेब मतकर, गफूर बागवान, अनिल ताके, मोहन कुटे, लक्ष्मण मिसाळ, अशोक देवडे, महेश लोखंडे, बदाम चौधरी, मोहन गवळी आदी ग्रामस्थ उपोषणास बसले होते. गुरुवारी (ता.१४) नेवासा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते.

    भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे (Balasaheb Murkute) यांनी उपोषणकर्त्यांची भेट देऊन कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा घडवून आणली. अपुरे राहिलेले बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्याचे कार्यकारी अभियंता यांनी इंजिनिअर कल्हापुरे यांच्याकडून लेखी घेऊन नेवासा नायब तहसीलदार सानप यांच्या उपस्थितीत बंधारे भरून देण्याचा शब्द घेतल्यावर उपोषण सोडण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार सानप, ज्ञानेश्वर पेचे अनिल ताके सतिष गायके व ग्रामस्थ उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here