Ashok Chavan Resignation : काँग्रेसचा राजीनामा दिल्यावर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

    105

    नगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आज (ता.१२) पक्षातून आणि विधिमंडळातून आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा (Resignation) दिला आहे. त्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हा राजीनामा दिल्यावर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

    ‘दोन दिवसांमध्ये मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करणार'(Ashok Chavan Resignation)

    अशोक चव्हाण म्हणाले की, मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यासोबतच काँग्रेस वर्किंग कमिटीचा व विधीमंडळ सदस्यत्वाचा ही राजीनामा दिला आहे. या निर्णयाबद्दल मला कुणाचीही तक्रार करायची नाही. मला कुणाबद्दलही व्यक्तिगत राग नाही. पुढच्या एक ते दोन दिवसांमध्ये मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं चव्हाणांनी स्पष्ट केलं.

    मला भाजपची कार्यप्रणाली माहिती नाही – चव्हाण (Ashok Chavan Resignation)

    ‘तुम्ही भाजपमध्ये जाणार का? असा प्रश्न विचारला असता चव्हाण म्हणाले, मला भाजपची कार्यप्रणाली माहिती नाही. मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. पुढच्या दोन दिवसांमध्ये मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहे. राजीनामा देण्याच्या विषयावर विचारले असता, प्रत्येक गोष्टीला कारण असलच पाहिजे, असं काही नाही. माझ्या जन्मापासून मी काँग्रेसचं काम केलं आहे. आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत, असं वाटलं म्हणून राजीनामा दिल्याने चव्हाणांनी सांगितले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here