
नगर : अशोक चव्हाणांची मदत कुठे घ्यायची आम्हाला चांगलेच माहित असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितलं. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. राज्यातलं एक जेष्ठ नेतृत्त्व भाजपमध्ये प्रवेश करत आहे. ज्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणूक गाजवली. विविध मंत्रीपद भूषवली, दोनवेळा जे राज्याचे मुख्यमंत्री झाले, ते अशोक चव्हाण आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत,असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचं कौतुक केले. अशोक चव्हाण यांची मदत कुठे घ्यायची हे आम्हाला माहिती आहे. अशोक चव्हाण यांचा अनुभव राहिलेला आहे. त्याचा आम्ही फायदा घेणार आहोत. राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा आमचं केंद्र करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अनेक नेते संपर्कात- देवेंद्र फडणवीस (Ashok Chavan Joins BJP)
आम्ही टार्गेट घेऊन चालत नाही. जे नेते योग्य वाटतात त्यांच्याशी आमची चर्चा आहे. हे खरं आहे काही नेते आमच्या संपर्कात आहेत. जमिनीशी जोडलेल्या नेत्यांशी आमचा संपर्क सुरू आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अशोक चव्हाण दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले. त्यांचा रोल काय असेल याबाबत केंद्र सरकारसोबत बोलून निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसला पक्ष सांभाळता येत नाही – देवेंद्र फडणवीस (Ashok Chavan Joins BJP)
काँग्रेसला त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही. आज काँग्रेस पक्ष कोणत्या दिशेने चालला आहे हे कळत नाही. देशातील मुख्य धारेत जायला पाहिजे, असे मुख्य नेत्यांना वाटते म्हणून नेते आमच्याकडे येत आहेत,असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.