Asaduddin Owaisi: असदुद्दीन ओवेसी हल्ला प्रकरण; हल्लेखोराला पिस्तुल विकणारा अटकेत

510

हापूर: काही दिवसांपूर्वी एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi)  यांच्या ताफ्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्या हल्ल्यात ओवेसी थोडक्यात बचावले होते. आता त्या हल्लेखोरांना पिस्तूल विकणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

दरम्यान, कोर्टाने हल्लेखोर सचिन आणि शुभम या दोन्ही आरोपी तरुणांना 24 तासांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत. एसएसपी सर्वेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, ओवेसींच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यातील सर्व महत्त्वाच्या बाबींवर पोलिस लक्ष देत आहेत.

मिश्रा यांनी सांगितले की, पिस्तूल पुरवणाऱ्या व्यक्तीचे नाव अलीम असे आहे. तो मेरठच्या मुंडली पोलिस स्टेशन हद्दीतील नंगलामालचा रहिवासी आहे. अलीमने सचिनला 1.20 लाख रुपयांना दोन पिस्तूल आणि 40 काडतुसे विकली होती. मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, अलीम हा बिहारमधून ट्रकचालकांमार्फत अवैध शस्त्रास्त्रांची तस्करी करायचा.

3 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आटोपून दिल्लीला निघालेले असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाला होता. त्यांच्या गाडीवर तीन-चार राऊंड फायर झाले होते. हल्ल्यानंतर स्वत: असदुद्दीन ओवेसी यांनीच गोळीबाराचे फोटो ट्विट करून गाडीवर गोळीबार झाल्याची माहिती दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here