
नगर : पुरातत्व (Archeology) सर्वेक्षण विभागाने चांदबिबी महाल (Chandbibi Mahal) येथे राष्ट्रीय संरक्षित स्मारक सलाबत खान परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. महालाचा अंतर्गत परिसरासोबतच महालाच्या भोवताली असणाऱ्या परिसरात या विभागातील कर्मचारी व चांदबिबी महल मार्निंग ग्रुप, गुरुकुल इंग्लिश स्कूल (English School) च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली. या वेळी प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे.

या स्वच्छता अभियानात पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सर्वात प्रथम सलाबत खान परिसरातील स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर महालाकडे जाण्याचा मार्ग व भिंतीच्या भोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी प्लास्टिक कचरा हा मोठ्या प्रमाणात आढळला आहे. यासंबंधी संरक्षण सहायक मनाेज पवार यांनी सांगितले की, ‘आपल्या शहरातील ऐतिहासिक वास्तू, स्मारके ही आपल्या शहराची ओळख आहे. त्यामुळे वास्तूंच्या भोवती स्वच्छता ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी ‘स्वच्छताही सेवा’ या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी होणे आवश्यक आहे.

ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यासाठी आल्यानंतर तेथे प्लास्टिक कचरा टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी पुरातत्व विभागाचे कर्मचारी संदीप हापसे, सतीश भुसारी, करीम शेख, जगदीश माळी, मुकेश कुमार, सागर कोळेकर, अजय बडे, जावेद शेख, वसिम इनामदार,अरबाज सय्यद, गौरव सरोदे, रिजवान शेख तसेच गुरुकुल इंग्लिश स्कूलचे प्रा. शीतलकुमार सर्वज्ञ, सचिन गरुड, सचिन अंधारे, अजीम शेख, प्रतीक राठाेड, मशुकर जायभाये, शमीम शेख, प्रा. ऋतुजा गाडीवान, आशा कुटे, रेणुका कांबळे, बलीन शांती आदी उपस्थित हाेते.





