Anandacha Shidha : दिवाळीतही मिळणार आनंदाचा शिधा; ‘या’ दोन नव्या वस्तूंचा होणार समावेश

    155

    नगर : राज्यातल्या नागरिकांना यंदा दिवाळीत देखील १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा (Anandacha Shidhaदिला मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shindeयांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. याच बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने राज्यातील नागरिकांना ही बातमी दिली आहे. विशेष बाब म्हणजे यंदाच्या आनंदाचा शिध्यात दोन नवीन वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, दिवाळीनिमित्त राज्यातील शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज (ता.३) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचाही समावेश करण्यात आला आहे. पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल अश्या ४ च वस्तू होत्या. मात्र आता यामध्ये दोन वस्तूंची भर पडली आहे. हा आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत वितरित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ५३० कोटी १९ लाख इतक्या खर्चास देखील आजच्या कॅबिनेट बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

    राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे त्याचबरोबर नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिका असलेल्या १ कोटी ६६ लाख ७१ हजार ४८० शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here