Alibag रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

510

अलिबाग,जि. रायगड दि.15 (जिमाका) :- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाच्या 74 व्या वर्धापनदिनी ध्वजारोहण जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.


यावेळी करोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरचा वापर, मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या सूचनांचे काटेकोर पालन करीत अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.मेहत्रे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी चिंतामणी मिश्रा, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोशन मेश्राम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसिलदार सचिन शेजाळ, सतिश कदम, जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.

त्यानंतर जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.
०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here