
नगर : गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात हुलकावणी दिलेल्या पावसाचे पुन्हा आगमन (Return of the rains) झाले आहे. हवामान खात्याकडून नगरसह २९ जिल्ह्यात यलाे अलर्ट (Alert) देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये (Farmers) समाधानाचे वातावरण आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या भाकितानुसार नगर, रायगड, ठाणे, पुणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसाने दडी मारल्याने बहुतांश ठिकाणी पिके करपून गेली हाेती. त्यामुळे शेतकरी हताश झाले हाेते. मात्र, पावसाने पुन्हा आगमन केल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे.
अजूनही नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे डाेळे आकाशाकडे लागले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील २४ तास महत्त्वाचे असून या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.





