Akola 97 अहवाल प्राप्त, एक पॉझिटीव्ह, चार डिस्चार्ज – रॅपिड चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह

475

अकोला,दि.16(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 97 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 95 अहवाल निगेटीव्ह तर दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.15) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57806(43212+14417+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर दोन + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह दोन.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 309887 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 306318 फेरतपासणीचे 401 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3168 नमुने होते. आजपर्यंत एकूण 309852 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 266640 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दोन पॉझिटिव्ह

आज दिवसभरात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व एक पुरुषाचा समावेश असून ते अकोला मनपा हद्दतील रहिवासी आहे. दरम्यान काल (दि.15) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, त्याची नोंद एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे, याची नोंद घ्यावी.

चार जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

35 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57806(43212+14417+177) आहे. त्यात 1135 मृत झाले आहेत. तर 56636 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 35 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here