Ajit Pawar : आशियाई क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंसाठी अजित पवारांची मोठी घोषणा

    126

    नगर : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (ता.२७) राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha election) अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games) विजेतेपद पटकावणाऱ्या खेळाडूंसाठी बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.

    पदकविजेत्या खेळाडूंवर अर्थसंकल्पात बक्षिसांचा वर्षाव (Ajit Pawar)

    हांगझोऊ येथे २०२३ ला  झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत तब्बल १०७ पदकं पटकावली होती. या स्पर्धेत एकूण ६५५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ज्यात ७३ भारतीय खेळाडूंचा समावेश होता. या ७३ खेळाडूंनी भारताला ३२ पदकं जिंकून दिली. या पदकविजेत्या खेळाडूंवर अर्थसंकल्पात बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे.

    सुवर्णपदकावर नाव कोरणाऱ्या खेळाडूंना १ कोटीचे बक्षिस (Ajit Pawar)

    आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरणाऱ्या खेळाडूंना १ कोटी रुपये बक्षिस म्हणून दिले जाणार आहेत. तर रजत पदक पटकावणाऱ्या खेळाडूंना ७५ लाख रुपये दिले जाणार असून कांस्यपदक पटकावणाऱ्या खेळाडूंना ५० लाख रुपये दिले जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here