Ajit Navale : सरकारचे धाेरण शेतकऱ्यांना वाऱ्यावर साेडणारे : डाॅ. अजित नवले

    113

    Ajit Navale : नगर : राज्यातील निम्म्या भागातील शेती ही भीषण दुष्काळात गेली आहे. शेतकऱ्यांनी (farmer) घेतलेले कर्जही दुष्काळातच गेल्याचे चित्र आहे. हे स्पष्ट दिसत असतनाच कर्ज माफ (loan waiver) करण्याऐवजी सरकार ते स्थगित करत आहे. सरकारचे असे वर्तन हे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे असल्याचे किसान सभेचे नेते डाॅ. अजित नवले (Ajit Navale) यांनी म्हटले आहे.

    नवले म्हणाले, ”राज्यात यंदा कमी झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरण्याचे संकट ओढावले. राज्य सरकारने ४० तालुक्यांसह १०२१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच या भागातील पीक कर्ज वसुलीला सरकारने स्थगिती दिली आहे. सध्या जरी कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली असली, तरी ती केली जाणारच आहे. त्या कर्जाचे पुनर्गठन कर्जाच्या व्याजासह होणार आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकार ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देणार अशी घोषणा करण्यात आली होती. तीन अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली. मात्र, आता चौथा अर्थसंकल्प जवळ आला, मात्र अद्यापही ही घोषणा हवेतच आहे. अजूनही शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात आलेले नाही.”

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here