
आता नाराज असणारे किंवा इतर काही कारणांमुळे दूर असणाऱ्यांना सोबत घेऊन चालण्यासाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यात पहिला नम्बर आहे माजी आमदार सुधीर तांबे यांचा. सध्या त्यांचं काँग्रेस पक्षाकडून निलंबन करण्यात आलेलं आहे.
नाशिक शिक्षक पदवीधर साठी त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली होती. परंतु असे असूनही त्यांनी अर्ज भरलाच नाही. त्यामुळे पक्षाने कारवाई करत त्यांना निलंबित केले होते. यावेळी त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे हे अपक्ष लढले व निवडूनही आले.
परंतु यावेळी त्यांना भाजपने साथ दिली असे म्हटले जात होते. परंतु या दरम्यान काँग्रेसकडून सुधीर तांबे यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली,
दोन महत्वाच्या नेत्यांची मोर्चेबांधणी
महाराष्ट्रातील दोन प्रमुख नेते सुधीर तांबे यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्याच्या विचारात आहेत. पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी अहमदनगर आणि उत्तर महाराष्ट्रातील दोन प्रमुख नेत्यांनी दिल्लीत चर्चा सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते सर्वांना सोबत घेऊन जाणार असल्याचे बोलले जात आहे. प्रदेशाध्यक्षांकडून हिरवा कंदील न मिळाल्याने नेत्यांनी दिल्लीत मोर्चेबांधणी केलीये.
राजकीय गणित काय ?
सुधीर तांबेंवर निलंबनाची कारवाई मागे घेत त्यांना पक्षात आणण्यामागे राजकीय गणित काय असणार याची चर्चा रंगली आहे. पुन्हा एकदा तांबे यांना पक्षात स्थान मिळणार का? की त्यांना दुसरी काही जबाबदारी दिली जाईल? हे पाहणे देखील गरजेचे आहे.
सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीची अंतर्गत बंडाळीमुळे कमजोर झालेली ताकद वाढवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे का? की आगामी आमदारकीच्या निवडणुकांसाठीचे काही वेगळे राजकीय फासे टाकण्याचा विचार काँग्रेस करतंय का? याची चर्चा सध्या राजकारणात रंगली आहे.