Ahmednagar Politics : ज्यांनी निळवंडेच्या कामांना विरोध केला, तेच आता श्रेय घेतात

    132
    Ahmednagar Politics : निळवंडे धरण व डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून सरकारकडून वेळोवेळी निधी मिळवला.

    अनेक अडचणीवर मात करून पूर्ण केलेले धरण आणि दोन्ही कालव्यांमधून आलेले पाणी हे पुढील अनेक पिढ्या समृद्ध करणारे आहे.केलेल्या कामाचा मोठा आनंद व समाधान होत आहे. परंतु ज्यांनी या कामांना विरोध केला, ते आता श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे.

    काम कोणी केले ते जनतेला माहिती आहे, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.हिवरगाव पावसा येथे उजव्या कालव्याचे जलपूजन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

    हिवरगाव पावसा येथे उजव्या कालव्याचे जलपूजन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, अॅड. माधवराव कानवडे, आर. बी. राहणे, उत्तमराव घोरपडे, गणपतराव सांगळे, रामदास पाटील वाघ, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे आदी उपस्थित होते.

    आमदार बाळासाहेब थोरात यांचे गावोगावी तरुणाईने जंगी स्वागत केले. यावेळी प्रत्येक गावच्या शेकडो सुवासिनीने औक्षण करत पाण्याचे जलपूजन केले.आमदार थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी चिंचोली गुरव येथे घेतलेल्या पाणी परिषदेतून निळवंडे येथे धरणाचा निर्णय झाला. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. धरणाबरोबर डाव्या आणि उजव्या कालव्याचे काम आपणच मार्गी लावले.

    डॉ. तांबे म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी निळवंडे धरणासाठी जागा निवडली. जास्तीत जास्त भागाला पाणी देण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी नियोजन केले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here