Ahmednagar News Update : नगर शहरातील रस्त्यांसाठी ३३ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी मंजूर

    115

    Ahmednagar News Update : नगर : नगर (Ahmednagar News Update) शहराचा अनेक वर्षांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य सरकारकडे विविध विकास कामासाठी पाठपुरावा केला असून टप्प्याटप्प्याने निधी प्राप्त होत आहे. त्यामुळे शहर विकासाला गती मिळाली आहे नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे नियोजनबद्ध व कायमस्वरूपी मार्गी लागावी, यासाठी दर्जेदार कामाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. राज्य सरकारच्या अर्थसंकल्प पुरवणी यादीमध्ये शहरातील विविध रस्त्यांसाठी ३३ कोटी ४३ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी दिली.  

    नगर शहरातील अत्यंत महत्त्वाचा ओळखला जाणारा रस्ता म्हणजे तारकपूर पत्रकार चौक ते डीएसपी चौकापर्यंतच्या रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आरसीसी साईट गटार, फुटपाथ, दुभाजक व पथदिवे ही कामे मार्गी लागणार आहे. केडगाव लिंक रोड रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. उर्वरित राहिलेल्या कल्याण महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा पुणे व कल्याण रोड महामार्गाला जोडणारा अत्यंत महत्वाचा रस्ता असून यावरील आरसीसी पुलाचे काम देखील मार्गी लागले आहे, त्यामुळे दळण वळणाच्या व शहर विकासाच्या दृष्टीने हा रस्ता महत्वाचा ठरणार आहे. नगर शहराला जोडणाऱ्या डीपी रस्त्यांची कामे मार्गी लागावी यासाठी बुरूडगाव साळुंखे मळा ते अहमदनगर महापालिका कचरा डेपोपर्यंत रस्ता डांबरीकरण कामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. केडगाव अर्चना हॉटेल ते नेप्ती रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम मंजूर असून उर्वरित नेप्ती बायपास पर्यंतच्या रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, केडगाव लोंढे मळा सोनेवाडी रस्ता बायपासपर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

    नगर शहर मतदार संघातील सीना नदी, ओढे, नाले यावर पूर्वी पाईप टाकून दगडी पूल तयार करण्यात आले होते. त्यामुळे पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प होत होती. या सर्व पुलाचे कामे मार्गी लागावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला होता. यामध्ये बहुतांश आरसीसी पुलाची कामे पूर्ण झाली आहे. काही पुलाची कामे सुरू आहे. त्यातच नगर शहराला जोडणारा वाकोडी भिंगार नाल्यावरील पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्या कामासाठी २ कोटी ४४ लाख इतका निधी मंजूर झाला आहे. ही सर्व कामे आता लवकरच सुरू होतील, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here