Ahmednagar news: हनी ट्रॅपचा बळी..! महिलेच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

    213

    अहमदनगर-एका महिलेच्या नेहमी पैसे मागण्याच्या त्रासाला व धमक्यांना कंटाळून तालुक्यातील वाशेरे येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शहरातील शेकईवाडी येथील संकेत लॉजमध्ये गुरुवारी रात्री घडली. प्रसिद्ध डीजे चालक शेखर अशोक गजे असे या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. हा हनी ट्रॅपचा बळी असल्याची चर्चा आहे.

    यासंदर्भात समजलेली माहिती अशी, एका महिलेने शेखर अशोक गजे यास आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. नंतर या महिलेने त्याच्याकडून लाखो रुपये उकळले असल्याची चर्चा आहे. ही महिला शेखर गजे यास अनेक दिवसांपासून धमक्या देऊन त्याच्याकडून पैसे उकळत होती. मात्र कर्जबाजारी झाल्याने शेखर यास तिला पैसे देणे शक्य होत नव्हते. अखेर या महिलेच्या जाचाला कंटाळून संकेत लॉज शेकईवाडी येथे त्याने आत्महत्या केली.याप्रकरणी मयत शेखर याची पत्नी शीतल हिने दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास खैरनार करीत आहेत. मयत शेखर गजे याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. त्याच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here