Ahmednagar Municipal Corporation : नगर महापालिका करणार पान टपऱ्यांवर कारवाई

    146

    नगर : नगर महापालिका (Ahmednagar Municipal Corporation) अतिक्रमणे हटविणे संदर्भात विषेश मोहीम राबविणार आहे. त्यामध्ये  शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील सर्व प्रकारची कच्चे पक्के अतिक्रमणे, टपऱ्या, शेड, हातगाड्या आदी हटविण्यात येणार आहेत. या मध्ये विशेषतः पान टपऱ्या, मावा, अवैद्य धंद्यांची ठिकाणे यावर कारवाई करुन अशा प्रकारची सर्व अतिक्रमणे निष्कासित करण्यांत येणार आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. 

     शहरातील सर्व प्रकारची छोटी मोठे फ्लेक्स बोर्ड, जाहिरात फलक, शुभेच्छा फलक, होर्डिंग, कट आऊट आदींवर कारवाई करण्यांत येणार आहे. बोर्ड अथवा फलक लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. अनाधिकृत फ्लेक्स बोर्ड, होर्डिंग्जमुळे उच्च न्यायालयाने दिलेले आदेश त्या अनुषंगाने शासनाचे आदेश यांचे अवमानना होत आहे. या बाबत सक्तीने कारवाई करण्यांत येणार आहे, अशा सूचना महापालिका आयुक्त पंकज जावळे यांनी सर्व संबंधितांना दिल्या आहेत.

    शहरातील मुख्य रस्त्या लगत अनेक दिवसांपासून विविध प्रकारची ना-दुरुस्त वाहने बंद अवस्थेत पडलेली आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा येत आहे. तसेच तेथील स्वच्छता करताना अडचण होत असते. या बाबत नागरिक वेळोवेळी तक्रार करीत असतात अशा प्रकारच्या सर्व वाहनावर महापालिकेतर्फ अतिक्रमण मोहिमे अंतर्गत जप्तीची कारवाई करुन दंडात्मक रक्कम वसूल करण्यांचे आदेश सर्व संबंधित प्रभागांना देण्यात आले आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here