अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: ‘ह्या’ तालुक्याने टेन्शन वाढवले; अवघ्या काही दिवसात 2032 लोकांना कोरोना
जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात येताना दिसत असतानाच पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. जिल्ह्यात हजारच्या पुढे संख्या जात आहे.
हे असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यातील एक तालुका जिल्ह्याचे टेन्शन वाढवत आहे.पारनेर तालुका नव्याने हॉटस्पॉट ठरत आहे.
तालुक्यात गेल्या महिनाभरात 2032 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर एका दिवसात तब्बल 210 रुग्ण आढळून आले आहेत.
बाधितांच्या संख्येच्या स्फोटात पारनेर तालुक्याने पुन्हा आघाडी घेतली आहे. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी याबाबत विविध उपाययोजना राबवल्या.
परंतु तालुक्यातील बाधितांचा आकडा काही केल्या कमी होईना. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी 52 गावांत 210 बाधित आढळले.
गावनिहाय आढळलेले रुग्ण असे – पाडळी आळे 1, कळसा 8, रेणवडी 1, लोणीमावळा 5, पाडळी दर्या 1, बाभुळवाडा 20, वडझिरे 4, भाळवणी 5, धोत्रे खुर्द 1, गोरेगाव 1,
सारोळा आडवाई 4, हिवरे कोरडा 3, निघोज 12, देवी भोयरे 5, वडगाव गुंड 1, शिरसुले 2, जवळी 4,गाडीलगाव 1, सांगवी सूर्या 3, गुणोरे 1, कोहकडी 1,
पळवे खुर्द 5, म्हस्णे 1, जातेगाव 6, वाघुंडे खुर्द 4, पानोली 1, नारायणगव्हाण 3, यादववाडी 1, कडूस 1, कळमकरवाडी 4,
पारनेर शहर 1, पुणेवाडी 1, कान्हुर पठार 3, काकणेवाडी 8, किन्ही 5, पिंपळगाव रोठा 2, नांदुर पठार 1, कारेगाव 1, चिंचोली 1, पिंपरी जेलशेन 2, रायतळे 7, सुपा 6, टाकळी
ढोकेश्वर 2, तिखोल 1, सावरगाव 2, कासारे 3, पोखरे2, वासुंदे 14, वडगाव सावताळ 7, देसवडे 4, पळशी 2, वनकुटे 13.




