Ahmednagar | शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात पशूहानीच्या घटना सविस्तर अहवाल सादर करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना

639

अतिवृष्टी आणि पावसामुळे बाधित नागरिकांचे केले स्थलांतर
शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात पशूहानीच्या घटना
सविस्तर अहवाल सादर करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना

अहमदनगर: जिल्ह्यात दिनांक ३० ऑगस्ट आणि ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे काही तालुक्यात नुकसानीच्या घटना घडल्या. पशुहानी, इतर जीवित आणि वित्तहानी संदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
प्राथमिक अहवालानुसार नगर तालुक्यात पावसामुळे देवगांव, रतडगाय, पोखर्डी, जेऊर, डोंगरगण या पाच गावात अंशतः एकुण सात घराचे नुकसान झाले असुन एकुण बाधित लोकसंख्या 21 आहे.
नेवासा तालुक्यात पावसामुळे घोडेगांव, शिरसगाव, सोनई (धनगरवाडी) या तीन गावात 3 घरांची अंशतः पडझड झाली आहे.
राहूरी तालुक्यात पावसामुळे देसवंडी. राहुरी खु. येथे एकुण दोन घराची अंशतः पडझड झालेली आहे.
शेवगांव तालुक्यात भगुर गावात स्थानिक लोकांच्या मदतीने व नेवासा येथील बचाव पथकातील बोटीच्या सहाय्याने 25 नागरिक मंगल कार्यालय शेवगांव येथे स्थलांतरित करण्यात आले. वरूर गावातील
नागरिक (मस्के वस्ती) औरंगाबाद येथील बचाव पथका मार्फत स्थलांतरीत करण्यात आले. आखेगांव येथील अंदाजे 100 लोकांना ग्रामस्थांच्या मदतीने शाळेत स्थलांतरीत करण्यात आले. लांडेवस्तीतील 50 नागरीक पोलीसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. एनडीआरएफचे पथक शेवगांव तालुक्यातील जोहरापूर येथे पोहोचले असुन तेथील लांडेवस्तीतील व कराडवस्तीतील नागरीकांची सुटका केली असुन त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सद्यस्थितीत शोध व बचाव कार्य सुरु आहे. तसेच आपत्तीग्रस्त भागात निवारा व जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. शेवगाव तालुक्यात 10 गावे बाधीत असुन 5 निवारा केंद्रामध्ये 90 नागरिकांची सोय करण्यात आलेली आहे. सध्या 150 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले
असुन 01 नागरीक बेपत्ता झाला आहे. तसेच मृत पावलेल्या जनावरांची सख्या 205 आहे. पशुधन व इतर जिवीत व वित्तहानीबाबत सविस्तर अहवाल प्राप्त होताच सादर करण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.
पाथर्डी तालुक्यात पावसामुळे कोरडगाव सोमठाणे, औरंगपुर, पांगोरी पिंपळगांव येथील नदी काठावरील गावे बाधित झाली आहेत. कोरडगांव गावातील नागरीकांची स्थानिक पथकाच्या सहाय्याने एकुण 80 बाधित कुटुंबामधील अंदाजे 230 लोकांना न्यु इंग्लीश स्कुल कोरडगांव, हरीहरेश्वर महाविदयालय कोरडगांव येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. सोमठाणे तलवड़े येथील 1 बाधित कुटुंबातील 05 सदस्य प्राथमिक शाळा सोमठाणे या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहे. तसेच तालुक्यात पावसामुळे मृत पावलेल्या जनावरांची संख्या 128 असल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले असून सविस्तर पाहणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here