Ahmednagar यशस्वी सापळा अहवाल

यशस्वी सापळा अहवाल

▶️ युनिट – अहमदनगर
▶️ तक्रारदार- पुरुष वय- ४९ रा.झोडेगांव, ता- गंगापूर, जिल्हा औरंगाबाद
▶️ *आरोपी = १) बापुसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे, ५२ वर्ष, धंदा – नौकरी, प्रभारी प्राचार्य, होमिओपॅथी मेडीकल कॉलेज, वडाळा महादेव, ता- श्रीरामपूर. रा. मानूर , ता-राहुरी, जिल्हा- अहमदनगर, वर्ग १
२) भारती बापुसाहेब इथापे, वय ३४, धंदा- नौकरी, लिपीक, होमिओपॅथी मेडीकल कॉलेज, वडाळा महादेव,ता.श्रीरामपूर, जिल्हा- अहमदनगर.
राहणार- निपाणी वडगांव, ता- श्रीरामपूर, जिल्हा -अहमदनगर
▶️ लाचेची मागणी-₹ १,४७,५००/-
▶️ लाचेची मागणी – दि- १२/०८/२०२१
▶️ लाच स्विकारली रक्कम- ₹ १,४७,५००/-
▶️ लाच स्विकारली दिनांक- १२/०८/२०२१
▶️ लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांच्या मुलीचे बी.एच.एम.एस पदवीचे पासिंग सर्टिफिकेट व इंटरशिप पुर्ण केल्याबाबतचे सर्टिफिकेट देणे करिता यातील आरोपी लोकसेवक क्रमांक १ यांनी तक्रारदार व त्यांची मुलगी यांचे कडे ₹ १,४७,५००/- ची मागणी केली.तक्रारदार यांनी ला प्र विभागाकडे दि १०/०८/२०२१ रोजी दिलेल्या तक्रारीवरून आज रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपी लोकसेवक क्रमांक १ यांनी तक्रारदार व त्यांची मुलगी यांचे कडे बी.एच.एम.एस पदवीचे
पासिंग सर्टिफिकेट व इंटरशिप पुर्ण केलेल्या कालावधीच्या हजेरीची ॲडजस्टमेंट करुन सर्टिफिकेट देणे करिता होमिओपॅथी मेडीकल कॉलेज वडाळा महादेव येथे पंचासमक्ष ₹ १,४७,५००/- ची मागणी केली. त्यानंतर आयोजित सापळा कारवाई दरम्यान सदर लाचेची रक्कम आरोपी लोकसेवक क्रमांक १ यांचे सांगणे वरुन आरोपी लोकसेवीका क्रमांक २ यांनी पंचासमक्ष स्विकारली असता दोन्ही आरोपी यांना रंगेहाथ पकडण्यात आले. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे
▶️ सापळा अधिकारी:-.श्याम पवरे, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि, अहमदनगर
▶️ पर्यवेक्षण अधिकारी -* हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र. वि.अहमदनगर
सापळा पथक:- दिपक करांडे, पोलीस निरीक्षक, पो हवा.संतोष शिंदे, पो ना.रमेश चौधरी, पो अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस अंमलदार संध्या म्हस्के,चालक पोलीस हवालदार हारुन शेख, पोलीस नाईक- राहुल डोळसे.
▶ *मार्गदर्शक -*मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
▶मा.श्री निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.
▶️ मा.श्री.सतिश भामरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक.
▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी:* मा.संचालक, उच्च शिक्षण विभाग.
——-•••••••••••••••••••••••——–
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७
@ टोल फ्रि क्रं. १०६४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here