- अहमदनगर (जिमाका वृत्त) दि. 11- कोविड – 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांची काटेकोर पणे अंमलबजावणी करावी.अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी संबंधित यंत्रणाना आज दिल्या. कोविड आजाराची वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाय योजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
- या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. रामटेके, महानगरपालिकेचे वैद्यकिय अधिकारी,उपस्थित होते. तर सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
- बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा यांच्या कामकाजा संदर्भात माहिती घेऊन तालुक्यातील लसीकरणाचे प्रमाण आणि कोविड चाचणीचे प्रमाण वाढविण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या. राज्य शासनातर्फे आणि जिल्हाप्रशासनातर्फे. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी लागू केलेल्या आदेशाप्रमाणे,सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवून जे कोणी निर्बंधांचे उल्लंघन करत असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. कार्यालयमध्ये पूर्व परवानगी शिवाय अभ्यागतांनी येऊ नये याचे सुद्धा पालन झाले पाहिजे, महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत हद्दीत निरीक्षक पथक नेमणूक, हॉटेल उपाहारगृह त्यांच्याकडून वेळेचे उल्लंघन होते का याची सुद्धा तपासणी करावी, दुकाने आणि आस्थापना मालक यांचे पूर्ण लसीकरण झाले आहे का याची पडताळणी करावी,माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत प्रमाणे सर्वेक्षण करावे.अशा सूचना जिल्हाधिकारी,डॉ भोसले यांनी दिल्या.
Home महाराष्ट्र अहमदनगर Ahmednagar : कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.जिल्हाधिकारी...






