Ahmednagar | अहमदनगर महापालिकेचे नागरिकांना आवाहन नगरकरांनो पाणी उकळून गाळून प्या | AMC

1023

अहमदनगर महापालिकेचे नागरिकांना आवाहन

अहमदनगर नगरकरांनो पाणी उकळून गाळून प्या विळद जलशुद्धीकरण केंद्र (Vilad Water purification Plant) येथे अमृत अभियान (Amrut Abhiyan) अंतर्गत नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाचे (New water purification project) सुरु असलेल्या कामामुळे काही प्रमाणात गढूळ पाण्याचा पुरवठा (Turbid water supply) होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे (Drink boiled and filtered water) असे आवाहन महापालिकेमार्फर्त (Ahmednagar Municipal Corporation) करण्यात आले आहे.

केंद्रशासित अमृत अभियान योजनेचे (Union Government Amrut Abhiyan Yojana) काम प्रगतीपथावर असून त्या अंतर्गत विळद जलशुद्धीकरण केंद्र (Vilad Water purification Plant) येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र येथून उपलब्ध होणार्‍या पाण्यामध्ये जलशुद्धीकरण प्रक्रिये शिवाय काही प्रमाणात मिसळले जात आहे. त्यादृष्टीने विळद जलशुद्धीकरण प्रकल्प व वसंत टेकडी जलकुंठ येथे तुरटी व क्लोरीनची (Alum and chlorine) मात्रा वाढवण्यात आलेली आहे.

या कामामुळे नागरिकांना काही प्रमाणात गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजाराची शक्यता लक्षात घेता शहरातील सर्व नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here