- Ahmed नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात घडलेली असून तोफखाना पोलिसांना फसवणुकीच्या गुन्ह्यात हव्या असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या तोफखाना आणि नेवासे पोलिसांवर आरोपीसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी 22 तारखेला घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार घटनास्थळी दाखल झाले आणि एका महिलेसह तीन जणांना बेड्या ठोकल्या.
- फसवणूक प्रकरणात शहरातील तोफखाना पोलिसांना पाहिजे असलेला नेवासे तालुक्यातील भेंडे येथील सागर मच्छिंद्र धनवडे याला पकडण्यासाठी शनिवारी दुपारी तोफखाना पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल सुधीर शिरसागर, पोलीस कॉन्स्टेबल गौतम सातपुते, विशाल केदार व ठाणे पोलिस दूर क्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल साळवे हे भेंडे खुर्द येथे धनवडे याच्या घरी गेले होते. सागर धनवडे हा यावेळी घरीच बसलेला होता त्यामुळे त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता सागर धनवडे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांनी चक्क पोलिसांवर हल्ला केला.
- पोलीस नेवासे पोलिस निरीक्षक बाजीराव पवार यांना समजताच त्यांनी तात्काळ सदर प्रकरण गांभीर्याने घेत घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी सागर यांची पत्नी सुरेखा धनवडे, वडील मच्छिंद्र रामभाऊ धनवडे, भाऊ सचिन उर्फ रुद्रा मच्छिंद्र धनवटे यांना ताब्यात घेताना अटक केली मात्र या हल्ल्यानंतर मुख्य आरोपी असलेला सागर धनवडे आणि त्याची बहीण सोनाली कुसळकर हे मात्र फरार झाले.
- तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गौतम सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोन महिलांसह पाच जणांच्या विरोधात नेवासे पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांवर केलेला हल्ला ही अत्यंत गंभीर बाब असून यापुढे सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांची कुठल्याही पद्धतीने गय केली जाणार नाही, असा इशारा देखील पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी दिला आहे.