Ahilyanagar Crime News : एकाची निघृण हत्या; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    29

    श्रीगोंदा-तालुक्यातील कोकणगाव येथे दुचाकीच्या थकित हप्त्यावरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ‘तु आमच्यामध्ये विनाकारण बोलू नकोस तुला काहीच विषय माहित नाही’ असे म्हटल्याचा राग मनात धरून भाऊसाहेब नामदेव रजपूत (वय 48) यांची धारदार हत्याराने छातीवर वार करून हत्या करण्यात आल्याची घडली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.17) सहा नामनिर्देशित आरोपींसह तीन ते चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृताची पत्नी दया भाऊसाहेब रजपूत (वय 41, रा. कोकणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा शुभम याने दिवाळीत श्रीगोंदा येथील शोरूममधून दुचाकी हप्त्यावर घेतली होती.

    हप्ता थकल्याने शोरूमकडून दुचाकी जप्त करण्यात आली. याच कारणावरून 16 जानेवारी रोजी आढळगाव येथील पानटपरीवर शुभम् व त्याचा मित्र यांच्यात चर्चा सुरू असताना महेश किरास चव्हाण (रा. आढळगाव) याने विनाकारण हस्तक्षेप केला. यावेळी ‘तु आमच्यामध्ये विनाकारण बोलू नकोस तुला काहीच विषय माहित नाही’ असे म्हटल्याचा महेश चव्हाण यास राग आला. त्याने शिवीगाळ व दमदाटी केली. या घटनेचा राग मनात धरून रात्री साडेनऊच्या सुमारास महेश चव्हाण याने त्याचे साथीदार अविल ईश्वर भोसले (रा. श्रीगोंदा), मनसुख अंबादास चव्हाण, नितीन अनिल शिंदे (रा. आढळगाव) यांच्यासह चारचाकी वाहनातून कोकणगाव येथे येऊन शुभम रजपूत यास शिवीगाळ व मारहाण सुरू केली. मारहाणीतून सुटून शुभम पळून जात असताना भाऊसाहेब रजपूत हे त्याला सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी शैला महेश चव्हाण हिच्यासह इतरांनी भाऊसाहेब रजपूत यांना धरून ठेवले असता महेश चव्हाण याने धारदार हत्याराने त्यांच्या छातीच्या डाव्या बाजूस ा केला. गंभीर जखमी अवस्थेत भाऊसाहेब रजपूत यांना प्रथम श्रीगोंदा येथील खासगी रुग्णालयात व त्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना शनिवारी (दि.17) दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन ससून रुग्णालयात करण्यात आले.

    याप्रकरणी महेश किरास चव्हाण, शैला महेश चव्हाण, मनसुख अंबादास चव्हाण, नितीन अनिल शिंदे (सर्व रा. आढळग ढळगाव), अविल अवि ईश्वर भोस्ले (रा. श्रीगोंदा), योगेश युवराज काळे काळे (रा. बिटकेवाडी, ता. कर्जत) तसेच इतर अनोळखी व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here