.
अफगाणिस्तानात गेल्या काही दिवसांत झालेल्या उलथापालथीचा जेव्हा भविष्यात विचार केला जाईल, तेव्हा काही फोटोंचा संदर्भ दिला जाईल. हा फोटो त्यातलाच एक ठरू शकतो. काबूलमधून पलायन करून निघालेले शेकडे अफगाण नागरीक, जे अमेरिकेच्या लष्करी विमानात असे खच्चून भरले आहेत.
.
या विमानात 640 माणसं बसली होती, नेहमीच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटींनी जास्त. यात बहुतांश पुरुष आहेत, पण अनेक महिला आणि लहान मुलंही आहेत. या चेहऱ्यांवर थोडीशी भीती आणि थोडीशी सुटका झाल्याची भावना दिसून येते आहे.
.
अमेरिकन संरक्षण विश्लेषक ग्रुप डिफेन्स वननं केलेला हा फोटो व्हायरल झाला असून, या फोटो ची त्याची पडताळणी केलेली नाही.
.