ADCC Bank : ADCC बँकेतर्फे सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर

    167

    नगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (ADCC Bank) ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी सभासदांना १० टक्के लाभांश (10 percent dividend) जाहीर करण्यात आला. हा लाभांश देण्यासाठी बँकेने ३०.८८ काेटींची तरतूद केली आहे. बँकेला सन २०२२-२३ या वर्षांमध्ये ५२.०५ कोटी इतका निव्वळ नफा बँकेला झालेला आहे. जिल्हा सहकारी बँकेची स्थापना झाल्यापासून बँकेने नेहमीच शेतकरी हिताचा कारभार केला आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी केले आहे.

    जिल्हा बँकेची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात नुकतीच पार पडली. यावेळी कर्डिले यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीच्या आकडेवारीसह गोषवारा सभेसमोर मांडला. प्रत्यक्ष आकडेवारी नमूद करीत बँकेची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे सांगितले. तसेच २०१५ पूर्वीच्या थकीत कर्जासंदर्भात वन टाइम सेटलमेंटचा निर्णय बँकेने घेतला. त्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या योजनेमुळे थकबाकीदार शेतकऱ्यांसह थकीत सोसायटी यांनाही दिलासा मिळणार आहे..

    यावेळी बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, संचालक सीताराम गायकर पाटील, अमोल राळेभात, अंबादास पिसाळ, अण्णासाहेब म्हस्के, चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, भानुदास मुरकुटे, गीतांजली शेळके, आमदार आशुतोष काळे, प्रशांत गायकवाड, अमित भांगरे, करण ससाणे, अनुराधा नागवडे, आशा तापकीर, मधुकर नवले आदी उपस्थित हाेते. या सभेचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी केले. सभेच्या सुरुवातीस बँकेचे तत्कालीन चेअरमन स्व. उदय शेळके तसेच अशोकराव भांगरे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. सामूहिक राष्ट्रगीत गायनाने सभेचा समारोप करण्यात आला. बँकेच्या सर्वसाधारण सभेत यापूर्वी उपस्थित असलेल्या शेतकरी, सभासदांना मिठाई दिली जात हाेती. यंदा सर्वसाधारण सभेत उपस्थित असलेल्या लोकांसाठी जेवणाचा बेत ठेवण्यात आला होता. सर्वसाधारण सभेच्या इतिहासात उपस्थित सभासदांना दिलेले पहिले जेवण अनेकांच्या चर्चेचा विषय ठरले.

    आर्थिक स्थिती वर्ष २०२२- २३

    भाग भांडवल – ३२६ कोटी ७८ लाख
    निधी – १०९१ कोटी ४४ लाख
    ठेवी -८५५५ कोटी अकरा लाख
    बाहेरील कर्ज -१५८७ कोटी ४९ लाख
    गुंतवणूक -४४४५ कोटी २३ लाख
    कर्ज येणे बाकी – ६०१० कोटी ४२ लाख
    नफा – ५२ कोटी ५ लाख
    खेळते भांडवल – ११८६१ कोटी ५८ लाख

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here