Accident: पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर कारला आग, 4 जण जिवंत जळाले

464

सुलतानपूर: उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री उशिरा मोठा अपघात झाला. एक वेगवान कार दुभाजकावर आदळल्याने कारमध्ये आग लागली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील 4 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत चार जण जिवंत जळाले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर एक कार डिव्हायडरला धडकली. अपघातामुळे स्फोट होऊन कारला आग लागली. ही सीएनजी कार होती, त्यामुळेच आगीने रौद्र रुप धारण केले.  आग इतकी भीषण होती की कारमध्ये बसलेल्या चार जणांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही आणि ते जिवंत जळाले. पोलिसांनी सांगितल्यानुसार, कार लखनौहून येत होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. मृतांपैकी एकाची ओळख पटली असून, त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

स्थानिकांनी सांगितल्यानुसार, अपघातानंतर गाडीत आग लागताच गाडीतील प्रवासी मदतीसाठी आरडाओरडा करत होते, मात्र भीषण आगीत त्यांना वाचवण्याचे धाडस कोणीच दाखवू शकले नाही. हे संपूर्ण प्रकरण गोसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अरवल किरी करवत गावाजवळचे आहे. रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here