Accident : अपघात रोखण्यासाठी गतिरोधक बसवण्याची मागणी

    118

    राहुरी : श्रीरामपूर-ताहाराबाद चौकात (Shrirampur-Taharabad intersection) नेहमी वाहनांची वर्दळ (Vehicular Traffic) असल्याने अपघातांचे प्रमाण वाढून अनेकजण मृत्यूमूखी पडले आहेत. या ठिकाणी तातडीने गतीरोधक (Antistatic) बसवून सिग्नल (Signal) उभारावेत व वाहतूक पोलीस नेमावेत अशी मागणी राहुरी फॅक्टरी परिसरातील सामाजिक संघटना यांनी तहसीलदार चंद्रजित रजपूत व डीवायएसपी डॉ.बसवराज शिवपूजे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

    या निवेदनात म्हटले की, राहूरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड मार्गावरील श्रीरामपूर-ताहाराबाद चौकात वाहनांची नेहमीच वर्दळ असते. येथे सातत्याने अपघात घडून अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. दोन दिवसापूर्वी चिंचविहिरे येथील योगेश पानसंबळ या तरुणाचा याच ठिकाणी ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. यापूर्वी शालेय विद्यार्थीनी व पालकास अपघातातच जीव गमवावे लागले आहेत. तसेच अनेक जण याठिकाणी अपघातात जखमी झाले आहेत.

    त्यामुळे श्रीरामपूर-ताहाराबाद चौकात गतीरोधक बसवावेत. सिग्नल उभारावेत तसेच वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अन्यथा राहुरी फॅक्टरी येथील सर्वपक्षीय संघटना यांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, आरपीआय तालुकाध्यक्ष विलास साळवे, साम्राज्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणपत गव्हाणे, योगेश नालकर,माजी नगरसेवक प्रदीप गरड आदींसह राहुरी फॅक्टरी, चिंचविहिरे येथील नागरिक यावेळी हजर होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here