Abhishek bachchan | अभिषेक बच्चन रुग्णालयात दाखल

605

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनला दुखापत झाली असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिषेकचे वडील अभिनेते अमिताभ बच्चन आणि बहीण श्वेता बच्चन रुग्णालयात पोहोचले आहेत. त्यांच्या पाठोपाठ अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन देखील त्याला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. पण अभिषेकला दुखापत कशी झाली? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

एका वृत्तानुसार, अभिषेक बच्चन त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. चित्रीकरणा दरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्याला मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अभिषेकला रुग्णालयात दाखल केल्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन आणि श्वेता बच्चन त्याला पाहण्यासाठी लिलावती रुग्णालयात पोहोचले आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने अमिताभ आणि श्वेता यांचा लिलावती रुग्णालया बाहेरील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here