भारतीय पुरुष हॉकी संघानं जर्मनीवर 5-4 अशी मात करत कांस्य पदकावर नाव कोरलं आहे. तब्बल 41 वर्षांनी भारताना धडाकेबाज खेळी करत ऑलिम्पिक पदक जिंकलं आहे.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच जर्मनी आक्रमक खेळी करत होती. भारतानं आपल्या संयमी खेळीच्या जोरावर जर्मनीचं आव्हान संपुष्टात आणलं.
- भारताची आत्तापर्यंतची पदके -*
? भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकीत आत्तापर्यंत 8 सुवर्णपदकं, 1 रौप्यपदक आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. असा विक्रम करणारा भारतीय हॉकी संघ जगभरातील एकमेव संघ आहे.
? सुवर्ण पदकं : 1928, 1932, 1936, 1948, 1952, 1956, 1964, 1980
? रौप्य पदकं : 1960
? कांस्य पदकं : 1968, 1972, 2020
? दरम्यान, भारतानं 1932 लॉस एंजोलोस ऑलिम्पिक, 1936 बर्लिन, 1948 लंडन, 1952 हेलसिंकी व 1956 मेलबर्न ऑलिम्पिक अशा सलग 6 ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकं पटकावली होती.
➖➖






