_*सर्दी-खोकल्यावर करा हे घरगुती उपाय, लगेच आराम मिळणार..!*_

_*सर्दी-खोकल्यावर करा हे घरगुती उपाय, लगेच आराम मिळणार..!*_ सध्याच्या काळात चोंदलेले नाक,घसा खवखवणे, खोकला.. ही लक्षणे जाणवू लागली, तरी कोरोनाच्या भीतीने घाबरायला होतं. बदलत्या हंगामात सर्दी-खोकल्यापासून आपण वाचू शकत नाही. त्यापासून त्वरित आराम मिळण्यासाठी या घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊ या.? *मधाचा चहा*खोकल्यासाठी लोकप्रिय घरगुती उपाय. मधामुळे खोकल्यापासून सर्वात जास्त आराम मिळतो. मधाचा चहा बनविण्यासाठी 2 चमचे मध कोमट पाण्यात किंवा हर्बल चहामध्ये मिसळा. हे मिश्रण दिवसातून एक-दोनदा प्या. 1 वर्षाखालील मुलांना मध देऊ नका.? *मीठाच्या पाण्याच्या गुळण्या*घसा खवखवणे वा ओल्या खोकल्यासाठी हा सर्वात प्रभावी उपाय आहे. मीठाचे पाणी घशाच्या मागील भागातील कफ, श्लेष्मा कमी करते. एक कप कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ विरघळेपर्यंत मिसळा. गुळणी करण्यापूर्वी किंचित थंड होऊ द्या.? *ओव्याची फुले*खोकला, घसा खवखवणे, ब्राँकायटिस आणि पाचक समस्यांवर एक चांगला उपाय आहे. एक कप गरम पाण्यात 2 चमचे ओवा घालून चहा बनवा. 10 मिनिटे तो तसाच राहू द्या, नंतर गाळून प्या.? *आलं*कोरडा खोकला, दम्याचा खोकला आलं कमी करू शकते. गरम पाण्यात आल्याचे तुकडे घालून उकळून घ्या, मग त्याचा चहा बनवा. त्यात मध वा लिंबाचा रस घाला.? *हळदीचे दूध*कोमट दुधात हळद मिसळून पिल्यास सर्दी-खोकल्यातून आराम मिळू शकतो. झोपेच्या आधी एक ग्लास कोमट हळद दूध पिल्यास सर्दी-खोकला लवकर बरा होताे.?? *(घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)*➖➖➖➖➖➖➖➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here