88 हजारांचा गुटखा माहिजळगावात जप्त
नगर, (दि.25 डिसेंबर) : कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे एका पानटपरीवर छापा टाकून 88 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
दि.23 रोजी रात्री 10 वाजता कर्जत पोलिसांनी माहिजळगाव येथील गुरुकृपा पान सेंटरवर छापा मारून महाराष्ट्र शासनाची बंदी असलेला बेकायदा 88051 रुपये किमतीचा गुटखा जप्त करून विक्रेता लक्ष्मण झुंबर भिसे (वय 36) रा. माहिजळगाव, ता. कर्जत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुरेश माने, पोलिस उपनिरीक्षक अमरजित मोरे, भगवान शिरसाठ, पोलिस अंमलदार भाऊसाहेब यमगर, गोवर्धन कदम, अमित बरडे, सुनील खैरे यांनी केली.