- _पंजाबराव डख यांनी वर्तविला 5 ते 18 सप्टेंबर पर्यंतचा अंदाज.._
- राज्यात गणरायाच्या आगमनाच्या दिवशी 31 तारखेला म्हणजेच महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली. राज्यातील अनेक भागात 31ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी पाऊस झाला. मात्र काही भाग कोरडेच होते, त्यामुळे अजूनदेखील राज्यात अनेक भागात शेतकरी बांधव पावसाची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे.
- हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाजानुसार 5 सप्टेंबर पासून ते 18 सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. मात्र सदर कालावधीत पाऊस हा भाग बदलत कोसळणार असल्याचे सुद्धा पंजाबराव यांनी नमूद केले आहे.
- तसेच शेतकरी बांधवांनी चार तारखेपर्यंत आपली शेतीची कामे करून घ्यावीत तसेच शेतमाल व आपल्या पशुधनासाठी योग्य ती व्यवस्था करून घ्यावी कारण 8, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. जेणेकरून अतिवृष्टीच्या काळात त्यांना नुकसान सहन करावे लागणार नाही.