45 दिवसांच्या युद्धानंतरही रशियाला कीववर ताबा मिळवता आला नाही, पुतिन यांनी आता ‘या’ अधिकाऱ्याकडे सोपवली मोहीम

390

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला 40 दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. मात्र आतापर्यंत युक्रेनची राजधानी असलेल्या कीववर रशियाला आपला ध्वज फडकता आलेला नाही. याच पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आता आपली रणनीती बदलली आहे. त्यांनी कीववर ताबा मिळवण्यासाठी रशियाच्या दक्षिणी लष्करी जिल्ह्याचा कमांडर जनरल अलेक्झांडर डव्होर्निकोव्ह यांच्याकडे युद्ध मोहीम सोपवली आहे.

डव्होर्निकोव्ह आता युक्रेनमधील रशियाच्या लष्करी मोहिमेची थिएटर कमांड सांभाळतील. सीएनएनने अमेरिकन अधिकारी आणि लष्करी तज्ज्ञांच्या हवाल्याने म्हटले आहे की, 9 मे रोजी विजय दिनापूर्वी रशियन जनरलची पुतिन यांना युद्धात काहीतरी मोठा कारनामा करून दाखवण्याची इच्छा आहे.

रशियामध्ये 9 मे रोजी विजय दिवस साजरा केला जातो. या दिवशी दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत युनियनने जर्मनीवर विजय मिळवला होता. युरोपियन अधिकार्‍यांनी विजय दिनाबाबत बोलताना स्वतःसाठी लादलेली डेडलाईन सांगत म्हटले आहे की, रशिया सैनिक आणखी चुका करू शकतात किंवा रशियन सैन्य बुकाला पूर्णपणे उध्वस्त करू शकतात.दरम्यान, शनिवारी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची कीव येथे भेट घेतली. जॉन्सन म्हणाले की, युक्रेनच्या लोकांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी कीवमध्ये राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here