437 अहवाल प्राप्त, पाच पॉझिटीव्ह, एक डिस्चार्ज ; रॅपिड चाचण्यात एक पॉझिटीव्ह

362

437 अहवाल प्राप्त, पाच पॉझिटीव्ह, एक डिस्चार्ज ; रॅपिड चाचण्यात एक पॉझिटीव्ह

अकोला,दि.6(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 437 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 432 अहवाल निगेटीव्ह तर पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर एकाला डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.5) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57783(43194+14412+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर पाच + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक = एकूण पॉझिटीव्ह सहा.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 306917 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 303367 फेरतपासणीचे 397 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3153 नमुने होते. आजपर्यंत एकूण 306917 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 263723 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

पाच पॉझिटिव्ह

आज दिवसभरात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुष व तीन महिलेचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापूर-चार, बाळापूर-एक. दरम्यान काल (दि.5) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, त्याची नोंद एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे, याची नोंद घ्यावी.

एक डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीया महाविद्यालयातून एका रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

52 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57783(43194+14412+177) आहे. त्यात 1134 मृत झाले आहेत. तर 56597 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 52 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

                                                       ०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here