27 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक
भांडवलदारांसाठी शेतकरी देशोधडीला || सुखदर्शनसिंग नठ27 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक अहमदनगर जोपर्यंत शेतकरी विरोधी तीन कायदे (Farmer Laws) मागे घेतले जाणार नाही, तोपर्यंत माघार नाही. शेतकर्यांच्या (Farmer) एकजुटीच्या लढ्यापुढे सरकारला माघार घ्यावीच लागणार असल्याचा विश्वास दिल्ली येथील टिकरी बॉर्डरवर (Border) शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे पंजाब किसान युनियनचे उपाध्यक्ष कॉ. सुखदर्शनसिंग नठ (Vice President of Punjab Kisan Union Co. Sukhdarshan Singh Nath) यांनी व्यक्त केला. मुठभर भांडवलदारांच्या हितापोटी शेतकर्यांना देशोधडीस लावण्याचे कार्य भाजप सरकार (BJP Government) करीत असल्याचा आरोप (Allegations) त्यांनी केला. दरम्यान, शेतकरी प्रश्नांसाठी 27 रोजी भारतबंदची (India closed) हाक देण्यात आली आहे.श्रमिक शेतकरी संघटना (Labor Farmers Association)-सत्यशोधक शेतकरी सभा (Satyashodhak Shetkari Sabha) व अखिल भारतीय किसान महासभा (Akhil Bharatiya Kisan Mahasabha) यांच्या वतीने राज्यभर केंद्र सरकारच्या लोकशाही आणि संविधान विरोधी तीन कृषी कायदेविरोधात (Agricultural laws) सुरू असलेल्या शेतकरी संवाद यात्रा सुरू आहे. शहरातील टिळक रोड (Tilak Road) येथील श्रमिक कार्यालयात झालेल्या शेतकरी मेळाव्यात कॉ. सुखदर्शनसिंग (Sukhdarshan Singh Nath) बोलत होते. यावेळी बिहार येथील भाकपचे आमदार कॉ. सुदामा प्रसाद, अ. भा. किसान महासभेचे राष्ट्रीय सचिव कॉ. राजाराम सिंग, कॉ. राजेंद्र बावके, कॉ. किशोर ढमाले, कॉ. सुभाष काकुस्ते, कॉ. आनंद वायकर, कॉ. अनंत लोखंडे, कॉ. जीवन सुरूडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.







