27 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

412

वाशिम दि.13 (जिमाका) जिल्हा जातीयदृष्ट्या संवेदनशील आहे. मागील काळात घडलेल्या जातीय घटनांच्या प्रतिक्रिया जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत राज्यात एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा महामंडळास शासनात समावेश करण्याच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू आहे. राज्यात नोकरीमध्ये पदोन्नतीस मागासवर्गीयांना 33 टक्के आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी विविध कर्मचारी संघटनांकडून विविध प्रकारच्या आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक, शेतकरी कर्जमाफी, पीक कर्जमंजुरी, दूध दरवाढ, वाढती महागाई, वीज बिल माफी,शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच इतर विविध मागण्यांसंदर्भात विरोधी पक्षाच्या वतीने तसेच शेतकरी संघटना इत्यादीचे वतीने आंदोलनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्हा जातीयदृष्ट्या आणि सण उत्सवाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असून मागील काळात जिल्ह्यात घडलेल्या जाती घटनांच्या प्रतिक्रिया आगामी सण उत्सवाच्या काळात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ व्हावे यासाठी 13 ते 27 नोव्हेंबर दरम्यान मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस यांनी पारित केले आहे. प्रतिबंधात्मक आदेशाच्या या कलमान्वये सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावास एकत्र जमण्यास किंवा मिरवणुकीस मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोविड -19 प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या बाबीचे पालन करून प्रस्तुत आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय /निमशासकीय अधिकारी ,कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरीत्या परवानगी दिलेल्या मिरवणुकीस व कार्यक्रमास हे आदेश लागू राहणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here