25 ऑगस्ट रोजी फेरफार अदालतीचे आयोजन नोंदी निर्गत करण्याच्या दृष्टीने फेरफार अदालती मध्ये प्रयत्न केले जाणार

553

पुणे दि 23: लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालती मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी आयोजित करण्यात येऊन जनतेच्या प्रलंबित, साध्या, वारस, तक्रारी फेरफार नोंदी निर्गत करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. कोविड १९ या प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे मागील महिन्यात 28 जुलै 3021 रोजी झालेल्या अदालतीमध्ये 3 हजार 269 इतक्या नोंदी निर्गत झाल्या आहेत. या महिन्यात चौथ्या बुधवारी फेरफार अदालत आयोजित करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार कोविड 29 नियमांचे पालन करून पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील क्षेत्रीय स्तरावर ऑगस्ट 2021 मधील फेरफार अदालत दि 26 ऑगस्ट 2021 रोजी आयोजित केली जाणार आहे.
पुणे जिल्हयात दि. 23 ऑगस्ट 2021 अखेर मुदत पूर्ण झालेल्या 13 हजार128 नोंदी प्रलंबित असून या नोंदीमध्ये प्रामुख्याने साध्या, वारस, तक्रार, व मुदत पूर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या नोंदी निर्गत करणेबाबत यापूर्वीही संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. अदालतीच्या दिवशी जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्या दृष्टीने फेरफार अदालती मध्ये प्रयत्न केले जाणार आहे. फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर संपर्क अधिकारी यापूर्वीच नियुक्त केले आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार देखील काही फेरफार अदालतीला उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
दिनांक 25 ऑगस्ट रोजी होणा-या फेरफार अदालतीमध्ये ज्या कोणाच्या फेरफार नोंदी प्रलंबित आहे अशा व्यक्तीनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहून मंडळ अधिकारी यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणेत येथून आपल्या नोंदी निर्गत कराव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here