रिलायन्स जियोमार्टद्वारे घराघरात दूध, अंडी आणि ब्रेड!
? रिलायन्स इंडस्ट्रीज जियोमार्ट या आपल्या ऑनलाइन ग्रोसरी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशभरातील घराघरात दूध, अंडी आणि ब्रेड पोहोचविण्याच्या तयारीत आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर चेन्नई आणि बंगळुरू या दोन शहरांमध्ये ही सेवा देण्यात येणार आहे.
? जियोमार्ट या सेवेच्या माध्यमातून ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्किगीच्या सुपर डेली, बिग बास्केटच्या बीबी डेली याशिवाय मिल्क बास्केट यासारख्या कंपन्यांना तगडी टक्कर देणार आहे. दिवाळीपासून देशभरात ही सुविधा सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे. मात्र बंगळुरू आणि चेन्नई या शहरांमध्ये कसा प्रतिसाद मिळतो त्यावर पुढील गणित अवलंबून असणार आहे.
? जियोमार्टची सेवा आता माय जियो ऍपच्या माध्यमातूनदेखील उपलब्ध होणार आहे. म्हणजेच माय जियो ऍपद्वारेदेखील आता ऑनलाइन ग्रोसरी खरेदी करता येणार आहे. सध्या कंपनी पिनकोडच्या आधारावर ऑनलाइन ऑर्डर स्वीकारत आहे.
? कंपनीची वेबसाईट ओपन करताच पिनकोड टाकल्यावर संबंधित विभागात डिलीव्हरी उपलब्ध आहे की नाही याची माहिती दिली जाते. शेतकऱयांचा माल थेट ग्राहकांना उपलब्ध करून दिला जातो असा दावा कंपनीने केला आहे.
➖➖➖➖➖➖➖