सिंधुदुर्ग : वेंगुर्ले शहरातील वेंगुर्ले नगरपरिषदेच्या (Vengurle Municipal Council) नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहाचे लोकार्पण रविवारी करण्यात आले. या सोहळा केंद्रीय मंत्री नारायण राणेंची (Narayan Rane) खास उपस्थिती होती. यावेळी राणे यांनी उद्घाटनानंतर संबधित इमारतीचं कौतुक करताना त्यानंतर राजकीय वक्तव्यही केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं मात्र तोंडभरुन कौतुक केलं.
यावेळी ‘सभागृहाची इमारत पाहूण वेंगुर्ल्यात आहे की अन्य कुठे आलो. नगराध्यक्षांनी वेंगुर्ल्याच्या विकासात भर घातली मी त्यांच अभिनंदन करतो.’ असं म्हणत राणेंनी इमारतीच्या कामाचं कौतुक केलं. त्यानंतर ‘आम्ही विकासाच्या कामात राजकारण पाहत नाही. देश आत्मनिर्भर होण्यासाठी तुम्ही काम करा मोदी साहेब बोलले. भारतीय जनतेसाठी मोदी साहेब 18-18 तास काम करतात.’ असं म्हणत पंतप्रधान मोदी यांचही कौतुक केलं.
पंतप्रधानांच्या कौतुकानंतर राणेंनी महाराष्ट्र राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा (Sindhudurg) विकास आम्ही केला, विमानतळाचं (Airport) कामही पूर्ण केलं. पण त्याचं श्रेय महाविकास आघाडी सरकार घेत आहे. असं म्हणत महाराष्ट्रात तीन चाकी रिक्षाचं सरकार आहे, असा टोलाही राणेंनी मविआ सरकारला यावेळी लगावला..