15 ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू होणार !

864

⚡ कोरोना संसर्गामुळे बंद ठेवण्यात आलेल्या शाळा 15 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. ? शिक्षण मंत्रालयाने शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी शाळा सुरू करण्यासाठी कार्यपद्धती ठरवावी, असे पोखरियाल यांनी म्हटले आहे. ?️ *केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणाले* : ▪️ ज्या शाळा सुरु होतील त्यांना कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शाळांनी राज्याच्या मार्गदर्शक सुचनांचं पालन करणं बंधनकारक आहे. ▪️ आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा आणि शारीरिक अंतर ठेऊन शिक्षण घेण, अशा दोन प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ▪️ विद्यार्थी पालकांची लेखी संमती असेल तरच शाळांमध्ये हजर राहू शकतात. हजेरीच्या नियमांमध्ये देखील शिथिलता देण्यात आली आहे. ▪️ विद्यार्थी शाळेत हजर राहण्याऐवजी ऑनलाईन क्लासचा पर्याय देखील निवडू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here