
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील आणखी एक घोटाळा समोर आला आहे. फक्त महिलांसाठी सुरू केलेल्या या योजनेत तब्बल १२ हजार ४३१ पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचं उघड झाले. लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला १५०० रूपये आर्थिक सहाय्य केले जाते. आरटीआयच्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेतीललाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे त्यात १२ हजाराहून अधिक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आले. याबाबत महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली. तपासानंतर या लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली. त्याचसोबत ७७हजार ९८० महिलांनाही अपात्र ठरवण्यात आले ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला होता. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त प्रसारित केले आहे.




