12 नोव्हेंबरला रिठद, मालेगाव व चिखली येथे महा विधि सेवा शिबिर

541

उच्च न्यायालयाचे न्या. रोहित देव यांची उपस्थिती

वाशिम दि.10 (जिमाका) आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिमच्या वतीने 12 नोव्हेंबर रोजी रिसोड तालुक्यातील रिठद येथील श्री गजानन महाराज संस्थान सभागृह, तहसील कार्यालय मालेगाव आणि मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजारजवळील चिखली येथील श्री. झोलेबाबा संस्थान सभागृह येथे महा विधि सेवा शिबिर आयोजित केले आहे.
या शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. रोहित देव हे प्रमुख अतिथी उपस्थित राहणार आहे. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्ष न्या. श्रीमती एस. एस. सावंत ह्या उपस्थित राहणार आहे.
या महा विधी सेवा शिबिरात केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभाचे वाटप लाभार्थ्यांना न्या. देव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील जनतेने घ्यावा. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. संजय शिंदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here